PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

हॉटेल व्यावसायिकांनी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करावे – आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन

पुणे लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

‘व्यावसायिकांशी संवाद’ या कार्यक्रमात आयुक्त सिंह यांनी शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठाणकर, स्थापत्य अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवड हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे आदी उपस्थित होते.

https://punelivenews.com/latest-news-from-pune-district/up-to-10-tax-rebate-through-pcmc-to-housing-societies-adopting-zero-waste-and-stp-practices

शहराच्या विकासात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळतो. हॉटेलमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे केला जाईल. हॉटेलच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्त सिंह यांनी दिले.

आयुक्तांनी हॉटेल व्यावसायिकांच्या शंकांचे निरसनही केले. हॉटेल व्यवसायात ट्रान्सजेंडर नागरिकांना नोकरी देण्याचा प्रस्ताव असोसिएशनच्या वतीने ठेवण्यात आला होता. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.