PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

देवराई संस्थेतर्फे देशी झाडांचे वृक्षारोपण

पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।तळेगाव दाभाडे येथील हरण्येश्वर टेकडीवर 18 एकर क्षेत्रामधे देवराई संस्थेच्या वतीने देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा संकल्प केला असून त्याची सुरुवात सर्व्हंट ऑफ गॉडचे लाल घनशाणी व मुख्याधिकारी विजय सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली.

देशी वृक्षारोपण करण्याकरिता, तालुक्यात व इतरत्र अनेक ठिकाणी देवराईसंस्था विविध उपक्रम राबवत असते,या अंतर्गत येथील हरण्येश्वर टेकडीवर 18 एकर क्षेत्रामधे वृक्षारोपण करण्याचा नवीन संकल्प केला.यावेळी देवराईचे गिरिष खेर,सुकन बाफना,राजेश सरोदे,डॉ.रामसिंग एस रावत,नवीन म्हाळस्कर,भरत पडवळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देवराई संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी गिरीश खेर म्हणाले देवराई संस्था अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असते. यामध्ये दरवर्षी पर्यावरण दिनी / मृग नक्षत्रावर भामचंद्र डोंगर,सीआरपीएफ टेकडी,घोरवाडी डोंगर इ ठिकाणी बिया फेकून व वृक्षारोपण केले जाते.