
पिंपळे सौदागरमधून दुचाकी चोरली
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । पार्क केलेली दुचाकी पिंपळे सौदागरमधून रात्री चोरीला गेली. याबाबत काशिनाथ जमादार (वय 48 वर्षे, रा. काटे चाळ, पिंपळे सौदागर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 4 जानेवारी सकाळपर्यंत या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोर हि घटना घडली. फिर्यादी यांची 80 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर गाडी चोरट्याने पळवून नेली.