
मित्राचा खून केल्याच्या संशयातून एकावर प्राणघातक हल्ला
पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iमित्राचा खून केल्याच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनी म्हाडा वसाहत या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांनी एकाला अटक केली. मुस्तफा उर्फ खड्डा शेख (वय 20, रा. नवीन म्हाडा वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम भंडारी (वय 26) यांनी तक्रार दिली आहे. तर, शेख याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम त्याच्या चुलत भावाच्या घरून कारने परत निघाला होता. त्यावेळी या टोळक्याने त्याचा पाठलाग केला. संशय आल्याने शुभमने पुन्हा कार युटर्न घेत भावाचे घर गाठले, तर या आरोपांनी देखील त्याचा पाठलाग करून तो पळत चौथ्या मजल्यावर जात असताना टोळकेही त्याच्या पाठिमागे धावले. त्यावेळी शुभम एका ओळखीच्या घरात शिरला व दरवाजा आतून लावून घेतला.
आरोपींनी त्याला तू आमचा मित्र बसवराज कांबळे याचा मर्डर केला आहे. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्याच्यावर हल्ला करून खूनाचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करत आहे.
