
एकाने कार केली हडप ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । दर महिन्याला 25 हजार मोबदला देतो म्हणून कार लंपास केली आहे. हा प्रकार 20 नोव्हेंबर 2020 पासून ते आजपर्यंत या कालावधीत घडला.
आशिष नरसिंह वेलाली (वय 41 रा. वाल्हेकरवाडी) यांनी फिर्याद दिली असून अजयकुमार गिरी (वय 40 रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. त्याने फिर्यादी यांची आय 20 ही कार कंपनीत लावतो व त्या बदल्यात महिना 25 हजार रुपये देतो असे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून कार नेली, मात्र मागील 1 वर्षापासून गाडी वापरत आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.