
पिंपरी येथे एकावर ब्लेडने वार
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । वॉशिंग सेंटर चालकाने त्याच्याच 18 वर्षीय कर्मचाऱ्यावर ब्लेडने वार केला. तसेच सोन्या काळे व त्याच्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला असे पोलिसात जाऊन सांग नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकेन अशी धमकी देणाऱ्या माथेफिरूला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.1) चिचंवड येथील अनुष्का वॉशींग सेंटर येथे सायंकाळी घडला.
रोहन खरे (वय 22 रा.चिंचवड) असे अटक माथेफिरूचे नाव असून वॉशिंग सेटर चालक करण बाळू ससाणे (वय 18 रा. चिंचवड) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या चिंचवड येथील रामनगर मधील अनुष्का वॉशींग सेंटर येथे आरोपीने पाठीवर ब्लेडने वार केले. त्याला जखमी करुन सांगितले की पोलीस ठाण्यात जा व तिथे सांग की सोन्या काळे, अर्जून गायकवाड व त्यांच्या मित्रांनी माझ्यावर कोयत्यानी वार केला, असे सांगितले नाही तर तुला मारून तुला कामावरून काढून टाकेन अशी फिर्यादीला धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी रोडन याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करत आहेत.