PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यात वानवडी येथे गोळीबार

पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I पुण्यातील सध्या गँगवारचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.

“यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” असा डायलॉग मारत टोळक्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला आहे.

पुण्यात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेनेचे अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष्याचे कार्यालय आहे. या ठिकाणी आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयावर टोळके आले. यावेळी त्यांनी अचानक गोळीबार करायला सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्‍याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला.

अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी यांनी मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसरमधल्या सय्यदनगर या ठिकाणी राहणाऱ्या इम्तियाज अफजल हुसेन शेख यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन सय्यदनगरमध्येच राहणाऱ्या आतिक इक्बाल शेख, सादीक शेख, हुसेन मुस्तफा कादरी यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..