
तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाने महिलेचे डोके फोडले
पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I माझी तक्रार करते का म्हणत मुलीच्या दिराकडून महिलेला डोक्यात मारून जखमी केले आहे. शनिवारी (दि.9) चिंचवड येथील वेताळनगर परिसरात रात्री हि घटना घडली
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात विशाल कृष्ण थोरात (वय 26, रा.वेताळनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी त्यांच्या बहिणीच्यामुलाला जेवणासाठी घेऊन जाण्यासाठी दुचाकीवरून आल्या होत्या. त्या त्याला घेऊन जात असताना आरोपी दुचाकीवरून आला व त्याने तू माझ्या नावाची तक्रार करते का? असे म्हणत फिर्यादी यांच्या डोक्यात कशाच्यातरी सहाय्याने मारून जखमी करून पळून गेला. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
