PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

बीआरटीएस रोडवर दुचाकींचा अपघात एकाचा मृत्यू

पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I बीआरटीएस रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात 38 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.17) रात्री पिंपळे सौदागर येथे घडला.

याप्रकरणी तुकाराम संपत भोंडवे (वय 64 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत तुकाराम भोंडवे (वय 38) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यावरून 22 वर्षीय दुचाकीस्वार (एमएच 14 जी.एफ.0952) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा मुलगा हा देखील दुचाकीवरून जात होता. यावेळी आरोपी दुचाकीस्वार हा बीआरटीएस रोडवरून उलट दिशेने वेगाने येत होता. समोरून आलेल्या दुचाकी अंदाज न आल्याने प्रशांत याच्या दुचाकीची समोरा समोर धडक बसली व प्रशांत याचे अपघाती निधन झाले.समोरील तरूणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.