
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी महिलेचे मंगळसूत्र लांबवीले
पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण हिसकावले आहे. हि घटना मोशी प्राधिकरण सेक्टर चार येथे मंगळवारी सकाळी घडली.
याप्रकऱणी 56 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला यांच्याकडे दुचाकीवरून आरोपी आले व त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. फिर्यादी त्यांना पत्ता सांगत असताना त्यांतील एकाने फिर्यादीच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे 80 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले. यावरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.