PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

श्वानाबाबत विचारपूस करून महिलेसोबत गैरवर्तन ; विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I श्वानासोबत मॉर्निंग वॉकिंग करत असलेल्या महिलेला श्वानाबाबत विचारपूस करत तिच्याशी गैरवर्तन केले. तिचा पाठलाग करून छेड काढली. याप्रकरणी एका व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री एक्झर्बिया सोसायटी, हिंजवडी येथे घडली.

संभाजी दत्तू पौळ (वय 45, रा. एक्झर्बिया सोसायटी, हिंजवडी. मूळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला त्यांच्या मैत्रीच्या श्वानासोबत एक्झर्बिया सोसायटी येथे शतपावली करीत होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीस बोलावून घेत त्यांच्या सोबत असलेल्या श्वानाबाबत विचारपूस केली. विचारपूस करत असताना आरोपीने फिर्यादींसोबत गैरवर्तन केले. फिर्यादी ( घाबरून तिथून निघून जात असताना आरोपीने पाठलाग करून त्यांच्या मोबाईल क्रमांक मागत त्यांची छेड काढली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.