PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

भर रस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I रस्त्याने जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केल्या प्रकऱणी एकावर देहुरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी मामुर्डी येथे सार्वजनिक रोडवर झाला.

पीडित मुलीच्या आईने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रवी राठोड (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पीडिता ही काम मिळाले नाही म्हणून घरी जात होती. यावेळी आरोपीने येऊन तिचा हात पकडला. तुझ्याशी लग्न करायचे आहे म्हणत तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.