
प्रेम प्रस्ताव नाकारल्याने विवाहित तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर हल्ला
पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iअल्पवयीन मुलीने प्रेम प्रस्ताव नाकारल्याने विवाहित तरुणाने मुलीवर हल्ला केल्याची घटना फुरसुंगी येथे बुधवारी सायंकाळी घडली . या प्रकरणी पोलिसांनी विवाहित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष मारुती धनके (वय 24, रा. फुरसुंगी) याने पीडितेकडे आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु, तिने त्याला नकार दिला. पीडितेने या घटनेची माहिती आरोपीच्या पत्नीलाही दिली होती. त्यानंतर चिडलेल्या डंके याने अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रमैत्रिणीसोबत असताना फुरसुंगी परिसरात धारदार शस्त्राने वार केला. अल्पवयीन मुलगी सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाली, मात्र डंके याने तिच्या मित्राला मारहाण करून पळ काढला.
आशिष पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या दरम्यान, तरुणी व आशिष यांची तोंडओळख आहे. आशिष याचा विवाह झालेला आहे. पण, त्याचे अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तो मुलीचा सतत विनयभंग करण्याच्या उद्देशाने वारंवार पाठलाग करत होता. मुलीने त्याच्या प्रेमाला नकार दिला होता. त्या रागातून त्याने मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली होती.
अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिस ठाण्यात डंकेविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.