PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

आकुर्डी येथील कारखान्याला भीषण आग

पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I आकुर्डीतील पांढारकर नगर येथील रिअल फ्राग्रांन्सेस अगरबत्ती पुणे प्रायवेट लिमिटेड या अगरबत्तीच्या कारखान्याला आज (मंगळवारी) सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला आहे. आगीचे रौद्ररुप पाहता घटनास्थळी एकूण सहा अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्या आग विझवण्याचे काम करत आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारखाना हा नागरी वस्तीत असल्याने कारखान्याच्या एका बाजूला बीना इंग्लिश स्कूल, दुसऱ्या बाजूला रेल्वे लाईन व दळवी नगर असा परिसर आहे. वर्दळीचा भाग असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. तसेच अग्निशमदलाच्या वतीने आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.आगीचे लोट व धूर दिसताच कारखान्याला लागूनच असलेल्या बीना इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत शाळेतील सुमारे 450 मुलांना शाळे बाहेर काढण्यास सुरुवात केली. आग लागली तेव्हा शाळेची मधली सुट्टी होती. त्यामुळे मुले मैदानात होती, तर काही मुले वर्गात होती. शिक्षकांनी धावाधव करत सर्व मुलांना शाळेबाहेर काढत त्यांच्या पालकांशी संपर्क साधत शाळेला सुट्टी देत मुलांना घेऊन जाण्याची विनंती केली. यावेळी पालक परिसरात येवून त्यांच्या मुलांना घरी घेऊन जात आहेत.