
कीटकनाशक पिऊन विवाहितेची आत्महत्या
पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. त्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती अक्षय कन्हैयालाल जाधव (वय 29 रा. चिखली) सासरे कन्हैयालाल किसनलाल जाधव (वय 59) सासू यांना अटक केली असून नणंद व तिचा पती संजय गांधिले यांच्यावरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
