PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

राष्ट्रवादीच्या अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षपदी मनीषा रघुवंशी

पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या शहराध्यक्षपदी मनीषा महेश रघुवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैलजा काळोखे यांच्या हस्ते रघुवंशी यांना नियुक्तिपत्र देण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके व सुरेश धोत्रे, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, युवक अध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.
शहरातील अनुसूचित जातीच्या महिला आणि युवती कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनीषा रघुवंशी यांनी सांगितले.पक्षाच्या तालुका अध्यक्ष दीपाली गराडे आणि शहर कार्याध्यक्ष अर्चना दाभाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.