
गो-हत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर बंदीबाबत कठोर कायदा करा – महेश लांडगे
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्रात हिंदूत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदू बांधवांना अपेक्षीत असलेला गो-हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजाणी करावी. तसेच, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गो-हत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतर सारख्या हिंदू धर्मविरोधी प्रवृत्ती बळावल्या आहेत. महाराष्ट्रात गो-हत्या बंदी कायदा आपल्या सरकारच्या काळात लागू करण्यात आला. मात्र, अद्यापही अवैधरित्या गो वंश संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. लव्ह जिहाद सारख्या घटनांमुळे हिंदू मुली असुरक्षित आहेत. दुसरीकडे, भुलथापा करुन धर्मांतर करुन हिंदू बांधवांवर अन्याय-अत्याचार करण्यात येत आहे.