PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कोयता गॅंग टोळीचा पर्दाफाश ; ५ जणांना अटक

पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।1 जानेवारी रोजी पाच जणांनी वर्चस्व वादातून नाना वाडा परिसरात हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाच्या प्रयत्न केला होता. याच पाच जणांना ,समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

समर्थ पोलिसांनी अशाच कोयता गँगवर कारवाई करत गगन अमरीकसिंग मिशन (वय 19 रा. नाना पेठ), अमन युसुफ खान (वय 22), अरसलन तांबोळी (वय 27, रविवार पेठ), मंगेश कैलास चव्हाण (वय 24 रा. रविवार पेठ), गणेश प्रकाश पवार (वय 27 रा. रविवार पेठ) यांना अटक केले आहे.

या आरोपींनी 1 जानेवारी रोजी पुण्यातील नानावाडा भागात जुन्या भांडणाच्या रागातून हातात कोयते घेऊन परिसरात दहशत पसरवली होती. पोलिसांनी मंगळवारी (दि.3) या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.