
दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच दगड लागला ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ Iदोघा व्यक्तींचे भांडण सुरू असताना एकाने फेकून मारलेला दगड त्या ठिकाणी बसलेल्या तिसऱ्याच एका महिलेला लागला. यामध्ये या महिलेच्या पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोले पाटील रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी सुनंदा कदम (वय 51) या महिलेने तक्रार दिली आहे त्यानुसार दोन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
, सुनंदा या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. काही कामानिमित्त त्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. काम झाल्यावर त्या एकट्या चहा पिण्यासाठी परिसरातील हॉटेलात गेल्या. तेथे पायरीवर बसून त्या चहा पित होत्या. त्यावेळी रस्त्यावर दोन जणांची भांडणे सुरु होती. ते एकमेकांना दगड मारत असताना एकाचा दगड त्यांच्या पोटात जोरात लागला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता लिव्हरला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
