PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कुष्ठरुग्णांची श्रवण तपासणी व श्रवणयंत्र वाटप

पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ I पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune News) आणि ससून रुग्णालयातर्फे कोंढव्याच्या डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग रुग्णालयातील येथील कुष्ठरुग्णांची श्रवण क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मोफत श्रवणयंत्र वाटप देखील करण्यात आले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कुष्ठरोगी रुग्णालय प्रशासक डॉ. विष्णू खरात, श्रीकांत चांडगे, आरोग्य सेवा कार्यालयाचे पराग बंगाळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

माणिक चव्हाण म्हणाले, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ट्रस्टतर्फेवर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत कोंढवा येथील कुष्ठरोग रुग्णालयात मोफत श्रवण क्षमता तपासणी व श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. समाजातील गरजूंना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ मिळवून देण्यात ट्रस्ट प्रयत्नशील आहे. तसेच ट्रस्टतर्फे अनेक प्रकारची विनामूल्य तपासणी शिबिरे देखील आयोजिण्यात येतात.