PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

१०० रुपये दिले नाहीत म्हणून कुऱ्हाडीने हात कापला

पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । केवळ 100 रुपये दिले नाही, म्हणून दोन तरुणांनी आणि दोन अल्पवयीन मुलांनी एका व्यक्तीचा मनगटापासून हातच छाटला.हीघटना पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात घडली.

या तरुणांनी दारूच्या नशेत ‘हॅपी न्यू इयर’ म्हणण्यावरून तसेच शंभर रुपये न दिल्याच्या रागातून पंकज तांबोळी या तरुणाच्या हातावर कुर्‍हाडीने वार केला. पंकज यांचा हात मनगटापासून वेगळा झाला आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे, गौरव गौतम मानवतकर या तरुणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पंकज तांबोळीचा मित्र आशुतोष माने याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आशुतोष, अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे रूममेट आहेत. 31 तारखेला मेस बंद असल्याने ते सर्वजण हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांच्यासोबत पंकज देखील गेला होता. जेवण झाल्यावर हॉटेल बाहेर आशुतोष आणि पंकज थांबले असता, दोन मुलांनी त्यांच्याकडे 100 रुपये मागितले. ते देण्यास यांनी नकार दिल्याने दोघांनी पंकजवर हल्ला केला. ही माहिती पोलीसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पंकजचा जीव वाचला.