PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण निवड कार्यक्रम

पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या, पोलीस मुख्यालय, निगडी येथे अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या संकल्पनेतून अभिनयात येणाऱ्या दिशा या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मस्ती झोपडपट्टी भागातील विविध कारणांमुळे(शाळाबाह्य झालेल्या बालकांसाठी विशेष बाल पोलीस पथक गुन्हे शाखा यांच्या वतीने तेरे देस होम्स जर्मनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत व्यवसाय प्रशिक्षण निवड कार्यक्रमाचे शनिवार, 3 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी कार्यक्रमात बोलताना अंकुश शिंदे पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांनी उपस्थित बालकांना सांगितले की “दिशा” उपक्रम तुमच्या उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असून शाळाबाह्य बालकांना पुनः श्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

या उपक्रमांतर्गत देण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण ग्रहण केल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये नवीन दिशा येणार असल्याचे सांगून “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा” असे बोललो उपस्थित बालकांना मार्गदर्शन करून आलेल्या संधीचा फायदा करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.