
विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी
पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । खासदार श्रीरंग बारणे यांच्या संकल्पनेतून ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन, मित्र परिवार आणि व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने विकासनगर येथील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना चष्मे वाटप आणि कंपास बॉक्स वाटप करण्यात आले.
शाळकरी लहान मुले ही आपल्या देशाचे भविष्य आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ही पिढी सदृढ व सक्षम व्हावी या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले होते. या अंतर्गत शाळेतील 300 मुलांचे डोळे तपासण्यात आले. आवश्यक त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र तरस, शाळेच्या मुख्याध्यापिका विस्पुते मॅडम, अंगणवाडी सेविका सुशीला चव्हाण, युवासेना संघटक रोहित माळी, युवा उद्योजक धीरज बाबर, अभिषेक दांगट, दिनेश माने , जेष्ठ नागरिक माणिक एकाड, दिलीप रोकडे सर्व शिक्षक वर्ग, पालक व नागरीक उपस्थित होते.