PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

वाईन खरेदी प्रकरणी महिलेची फसवणूक

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ Iऑनलाइन वाईन खरेदी करण्यासाठी गुगलची मदत घेणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन वाईन खरेदी केल्यानंतर पेमेंटच्या पाहण्याने या महिलेची गोपनीय माहिती घेत तब्बल 96 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणीने ऑनलाईन वाईन खरेदी करण्यासाठी गुगल वर सर्च केले होते. त्यावरून मिळालेल्या माहितीनंतर फिर्यादी यांनी एका क्रमांकावर फोन केला आणि वाईन ऑर्डर केली होती. दरम्यान समोरील व्यक्तीने पेमेंटच्या पाहण्याने फिर्यादी यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. फिर्यादी यांना यूपीआय ट्रांजेक्शनची रिक्वेस्ट एक्सेप्ट करण्यास सांगितली आणि त्यांच्या खात्यातील 96 हजार 902 रुपये परस्पर दुसरीकडे ट्रान्सफर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.