
दिघी येथे चौघांना कोयत्यासह अटक
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I दिघी पोलिसांनी चौघांना कोयत्यासह अटक केले आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 22) मध्यरात्री अडीच वाजता मॅगझीन चौकात करण्यात आली.
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I सुजल सुंदरराज गावीडन (वय 19 , रा. हडपसर), आकाश वाघमारे, आकाश तानावडे, विकास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मारुती घुगरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुगरे हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. गुरुवारी मध्यरात्री ते दिघी परिसरात गस्त घालत असताना मॅगझीन चौक ते ममता चौक दरम्यान चौघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरून भरधाव वेगात जाताना आढळले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ कोयते आढळून आले. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
