
जागेवर बळजबरी केला ताबा ; तिघांवर गुन्हा
पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iजागेवर अतिक्रमण करून बळजबरीने ताबा घेत दोघांना शिवीगाळ केली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिक नागू पालेकर (वय 76, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण विठ्ठल खानेकर, प्रकाश विठ्ठल खानेकर, एक महिला (सर्व रा. डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालेकर आणि त्यांचे सहकारी भुजंगराव शंकरराव खेनट हे रावेत गावठाण येथील त्यांच्या संस्थेच्या जागेत थांबले असताना आरोपींनी जागेतील पत्र्याच्या शेडला जोरात धक्का देऊन पत्र्याचे नुकसान केले. फिर्यादीस शिवीगाळ करून अंगावर धावून येत गचांडी पकडून धमकी दिली. फिर्यादी यांचे सहकारी खेनट यांनाही शिवीगाळ करून जागेत अतिक्रमण करून ताबा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.