
‘काजू कतली’साठी केला गोळीबाराचा प्रयत्न ; दोघांना अटक
पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पुण्यात चक्क ‘काजू कतली’ फुकट मिळावी यासाठी तरुणांनी गोळीबारचा प्रयत्न केला. सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या स्वीटमार्टमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे
पोलिसांनी या प्रकरणी 2 तरुणांना अटक केली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. सुरज ब्रह्मदेव मुंडे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडवर असलेल्या जोधाराम चौधरी यांच्या फुलपरी स्वीट मार्टमध्ये घुसून या दोघांनी एक किलो काजू कतली फुकट मागितली. परंतु, चौधरी यांनी पैसे मागितले असता त्या दोघांना या गोष्टीचा राग आला. सुरज आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्या जवळील पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जवळील पिस्तूल जुने असल्याने राऊंड फायर झाले नाहीत, मात्र दहशत निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे कृत्य केले.