
खोट्या गुन्ह्याचा धाक ; अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I तुमच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करायचा आहे, असा खोटा बनाव करून दमदाटी आणि शिवीगाळ करत खंडणी उकळणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. आसिफ खान इस्माईल खान पठाण (रा. कोणार्क पुरम कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपीने एका व्यक्तीला खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यास नुकसान होईल अब्रू जाईल अशी भीती दाखवून त्याने तब्बल सहा लाख रुपये तक्रारदार व्यक्तीकडून उकळले होते. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर तक्रारदार व्यक्ती चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी आसिफ खान आणि इतर फरार झाले होते.
दरम्यान आसिफ खान आणि त्याचे सहकारी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जालना औरंगाबाद परिसरात जागा बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्थापना रचून आसिफ खान याच्यासह समीर महबूब शेख शहाबाज महमूद खान आणि इरफान हसन भोला या तिघांनाही अटक केली. आरोपी आसिफ खान हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरोधात औरंगाबाद आणि पुणे शहरात खंडणी आणि जबरी चोरीसारखे चार गुन्हे दाखल आहेत.