
प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत गुमास्ते यांचे निधन
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील प्रसिद्ध कवी ,लेखक निशिकांत दामोदर गुमास्ते ( वय 69 वर्षे) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ग. दि. माडगूळकर यांचे वारसदार कवी, छावा काव्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होत. सामाजिक आशयाच्या पथनाट्यातून त्यांनी प्रबोधन केले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली,जावई असा परिवार आहे.