
बांधकाम व्यावसायिकाकडून २६ लाखांची खंडणी
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । बांधकाम व्यावसायिकाला गृहप्रकल्पाचे काम बंद पाडू अशी धमकी देऊन 26 लाख 75 हजारांची खंडणी उकळणाऱ्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी चेतन सुभाष बालवडकर (वय 35), रोहन सुभाष बालवडकर (वय 33, दोघे रा. बालेवाडी), सागर वसंत बालवडकर (वय35, रा. धायरी), आदित्य दत्तात्रय हगवणे (33, रा. कोंढवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगर येथील बांधकाम व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.