PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ

पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ Iपुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत आणखी एकदा वाढ झाली आहे. राजकीय नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात यावा, यासाठी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला होता. मात्र, हा अहवाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळल्याचे वृत्त आहे.

माजी खासदार संजय काकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बच्चू कडू, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते. या गुन्ह्यात तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली होती. तत्कालीन गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याचा जबाबही या प्रकरणात नोंदविण्यात आला होता. मात्र, आता या गुन्ह्याचा (Illegal Phone Tapping) तपास बंद करण्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला होता. मात्र हा अहवाल फेटाळण्यात आला आहे.