
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाचा हेरीटेज वॉक
पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर व इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) पुणे विभाग यांच्या तर्फे ‘चिंचवड हेरिटेज वॉक’ हा उपक्रम राबविण्यात आला. हेरीटेज वॉक अंतर्गत विद्यार्थ्यांनी चाफेकर वाडा, भैरवनाथ मंदिर, मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी मंदिर व जिजाऊ पर्यटक उद्यान आदी ठिकाणांना भेटी दिल्या.
आर्किटेक्चर प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नुकताच आपला बारावीचा अभ्यासक्रम संपवून आर्किटेक्चर या क्रिएटिव्ह अभ्यासक्रमामध्ये प्रवेश केला. हा नवीन अभ्यासक्रम सोपा कसा होईल, या विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड कशी निर्माण करता येईल, निसर्गातून आपल्या ऐतिहासिक वास्तूंमधून कशी प्रेरणा घेता येईल, याचा प्राध्यापकांनी केलेला हा वेगळा प्रयोग होता. आर्किटेक्चरची प्राथमिक ओळख करून देताना प्रथम वर्षाच्या इंडक्शन प्रोग्रॅम 2022 मध्ये हेरीटेज वॉक हा उपक्रम सामील करण्यात आला.
आर्किटेक्ट चिन्मय सुदामे, आर्किटेक्ट प्रचिती धार्मिक, आर्किटेक्ट पौर्णिमा चितळे, आर्किटेक्ट केतकी मोहळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील एकूण 100 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. या उपक्रमांबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
