PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

अतिप्रसंगास नकार ;नग्न फोटो पाठविण्याची दिली धमकी

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I अतिप्रसंग करताना नकार दिला असता नग्न फोटो काढून ते नवऱ्याला पाठवण्याची धमकी देणाऱ्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) निगडी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मानतेष सिद्धू यतनाळकर (रा. निगडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडिता घरात एकट्या असताना आरोपी घरात घुसला व त्यांनी फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने नकार दिला असता आरोपीने फिर्यादीचे फोटो काढले व माझ्या म्हणण्यानुसार वागली नाही, यातली कोणतीही गोष्ट नवऱ्याला किंवा पोलिसांना सांगितली तर हे नग्न फोटो नवऱ्याला पाठवण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi) गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.