
सराफ असल्याचे सांगून चोरटयांनी घातला १९ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या ‘चंदुकाका सराफ’चा संचालक किशोर शहा बोलतोय, असे सांगून स्टेट बँकेला बनावट ई-मेल पाठवत तब्बल 19 लाख रुपयांची रक्कम RTGS ने ट्रान्सफर करायला लावून गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुण्यातील ट्रेझरी शाखेत शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्स असलेल्या चंदुकाका सराफ अँड सन्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर किशोर शहा बोलत असल्याचा फोन करुन एक बनावट मेल पाठवण्यात आला. तसेच स्टेट बँकेच्या मॅनेजरला मी तुमचा “valuable” कस्टमर असे सांगून नातेवाईक आजारी असल्याचे कारण देत तातडीने पैसे RTGS करायला सांगितले.
बँकेचा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले, मात्र नंतर हा सगळा प्रकार बनावट असल्याचे लक्षात येताच शाखा व्यवस्थापकाने पोलिसांकडे धाव घेतली.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.