
देहूरोड येथे घरफोडी ; लाखोंचा ऐवज चोरला
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याने घरातून 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना देहूरोड या ठिकाणी घडली आहे.
याबाबत ज्ञानेश्वर पवार (वय 65 वर्षे, रा. देहू रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भा.द.वि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे परिवारासह तुळजापूर, अक्कलकोट असे देवदर्शन करण्यासाठी गेले असताना चोरट्याने घराचा टाळा तोडून घरातील 4.25 लाख रुपये रोख रक्कम चोरी करून नेली आहे.