PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

दगडाने ठेचून महिलेची निर्घृण हत्या

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।पुणे शहर खुनाच्या घटनेने हादरले आहे. शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तीस ते पस्तीस वर्षे वयाच्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पूर्व परिसरातील मेफेअर एलिगंजा सोसायटीच्या समोर असणाऱ्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. मयत महिला अंदाजे 30 ते 35 वर्षाची आहे. चेहऱ्यावर दगडाने वार करून या महिलेचा चेहरा संपूर्णपणे विद्रूप करण्यात आला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एका झुडपात फेकून देण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे