PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

प्रियकराची प्रेयसीला मारहाण ; आयुष्यभर छेडण्याची दिली धमकी

पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iप्रियकरासोबतचे नाते तोडल्याने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव खुर्द परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 22 वर्षे पूर्ण विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोघांचे प्रेमसंबंध होते. पण, त्यांच्या प्रेमाबाबत कुटूंबाला समजले. त्यामुळे तरुणीने दोघांमधील प्रेमसंबंध तोडले. त्याचा राग आल्याने प्रविणने तरुणीचा पाठलाग केला. तर, तिला मारहाण केली. तिच्या मैत्रीणीला देखील शिवीगाळ केली. रिलेशनशिपमध्ये न राहिल्यास आयुष्यभर त्रास देण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.