
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज 23 डिसेंबर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुक्ता टिळक यांचं ( काल 22 डिसेंबर दीर्घ आजाराने निधन झालं होतं. मागील पाच महिन्यापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या अखेर त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.