
भाजप आ. लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन
पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ । पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
जगताप यांचा कॅन्सरशी लढा सुरु होता.अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. पिंपरीच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी 7 वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लक्ष्मण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शन घेण्यासाठी दुपारी 3 ते 6 या वेळेत त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे.