PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे लाईव्ह I 30 डिसेंबर २०२२ I ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला. भोसरी – तळवडे रस्त्यावर दुर्गानगर हा चौक आहे. या चौकामधून यमुनानगर, टिळक चौक, त्रिवेणीनगर चौक व थरमॅक्स चौक येथे जाता येते. नागरिकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका पुरुष दुचाकीस्वाराचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याला ट्रकने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला.

स्थानिक नागरिक बाबा परब म्हणाले, की ट्रक तळवडेहून भोसरीला जात असताना अपघात झाला. दुचाकीस्वार ट्रकखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

 

यमुनानगर रहिवासी सखाराम सोलंके म्हणाले, की दुर्गानगर चौक हा निगडीमधील एक महत्त्वाचा चौक आहे. येथे वाहतूक सिग्नल आहे; पण वाहतूक पोलीस नसतात. त्यामुळे वाहनचालक वाहतूक नियम पाळत नाहीत. त्यामुळे दररोज छोटे अपघात होत असतात. पण, आज खूप मोठा अपघात होऊन त्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ म्हणाले, की “दुर्गानगर चौकात अपघात घडला आहे. मी पोलीस पथकासोबत घटनास्थळी चाललो आहे.