
वडगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्ता काँक्रीटकरण कामाला सुरुवात झाली. या कामासाठी सुमारे 42 लक्ष 26 हजार रुपये खर्च येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संपन्न झाला.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातुन नगराध्यक्ष मयुर ढोरे याच्या सहकार्याने व नगरसेविका पुजा विशाल वहिले यांच्या विशेष प्रयत्नातून व पाठपुराव्यातुन हा निधी उपलब्ध झाला आहे.
या समारंभ प्रसंगी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे,वडगाव शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, वडगाव शहर महिला अध्यक्ष पद्मावती ढोरे,नगरसेवक राहुल ढोरे,नगरसेवक चंद्रजित वाघमारे,नगरसेविका पुजाताई वहिले, नगरसेविका मायाताई चव्हाण,शारदाताई ढोरे,चेअरमन चंद्रकात ढोरे,सुनिल चव्हाण,राजेश बाफना,संतोष खैरे,प्रमोद वहिले,मंगेश खैरे, शैलेश वहिले,तुषार वहिले,गौतम सोनवणे,सौरभ सावले,संतोष देशमुख, संतोष पवार,केदार बवरे तसेच प्रभागातील व एकविरा काॅलनीतील सर्व नागरिक व महिला भगिनी, मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.