
पती-पत्नीला बेदम मारहाण ; दोघांना अटक
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ ।जुन्या भांडणाचा राग मनात धरून पती-पत्नीला बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. हा प्रकार खराळवाडी येथे 31 डिसेंबर रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
योगेश गोडसे (वय 30) व संकेत गोडसे (वय 26) यांना अटक केली असून चेतन गोडसे (वय 32) सर्व रा. खराळवाडी याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादी हे कामावरून घरी जाताना आरोपींनी टेरेसवरून फिर्यादीच्या डोक्यावर बाटली फेकली होती. याचा जाब फिर्यादीने विचारला होता. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तीनही आरोपींनी फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी फिर्यादी मदतीसाठी ओरडत असताना फिर्यादीची पत्नी तेथे आली असता आरोपींनी तिलाही हाताने मारहाण केली. फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी दोघांना यात अटक केली आहे.