
तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबच्या कामांचे कौतुक
पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबची D C Visit मीटिंग हॉटेल ईशा येथे उत्साहात पार पडली.पदग्रहण पासून आता पर्यंत घेण्यात आलेल्या प्रकल्पांची विस्तृत माहिती,तसेच पुढील वर्षभरात घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या नियोजनाची माहिती अध्यक्षा वैशाली दाभाडे आणि त्यांच्या टीमनी डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या समोर सादर केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मुक्ती पानसे यांनी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे क्लबच्या चालू कामगिरी बाबत,तसेच डिस्ट्रिक्ट 313 रॅली “AARYA” चे उत्तम नियोजन व सादरीकरण केल्या बद्दल कौतुक केले.तसेच आता वैशाली दाभाडे यांच्या कामाचा ऊरक पाहता आता त्यांनी डिस्ट्रिक्ट 313 कार्यकारणीमध्ये काम करावे असे गौरवोद्गार काढले .
या वेळी व्यासपीठावर अध्यक्षा वैशाली दाभाडे,उपाध्यक्षा संध्या थोरात,सचिव निशा पवार,खजिनदार अनुप्रिया खाडे, आयएसओ अर्चना देशमुख,एडिटर दीपाली चव्हाण,क्लब करस्पाॅडंट जयश्री दाभाडे उपस्थित होत्या. वैशाली दाभाडे यांनी बोलताना हे सर्व यश व नियोजन माझे एकटीचे नसून पूर्ण क्लब सदस्यांचे आहे अशी भावना व्यक्त केली.या वेळी रॅलीला विशेष सहकार्य केलेल्या सदस्यांचे मुक्ती पानसे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले
डी सी व्हीसीट यशस्वी करण्यासाठी होस्ट मुग्धा जोर्वेकर,हेमलता खळदे, निता काळोखे,साधना शाह, मीरा बेडेकर,अर्चना चितळे,माया भेगडे,निता देशपांडे,डॉ लीना कवितके, अंजली झवेरी, पूर्णा शाह व उज्वला बागवे यांनी परिश्रम घेतले.संध्या थोरात यांनी आभार मानले.
