PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यात एकावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I दोन महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडीवाला रोड परिसरात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

रोहित शिवा आगळे (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश श्रीमंत ओहोळ (वय 38) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी रेशमा आकाश ओहोळ यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ताडीवाला रोड परिसरात राहण्यासाठी आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.त्याचाच राग मनात धरून आरोपीने धारदार कोयत्याने फिर्यादी यांच्या पतीच्या चेहऱ्यावर डोक्यावर अनेक कानावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आकाश हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.