
तृतीयपंथीयांकडून चितेजवळ अघोरी पूजा
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I दोन तृतीयपंथी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जळणाऱ्या चितेजवळ अघोरी पूजा करत असताना आढळून आले होते. स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ या दोन तृतीयपंथीयांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशी पूजा करण्याचे खळबळजनक कारण समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मनोज धुमाळ या तृतीयपंथीयाच्या आईला कॅन्सर आहे. हा कॅन्सर बरा व्हावा यासाठी त्यांच्याकडून ही अघोरी पूजा केली जात होती. ही अघोरी पूजा करण्यासाठी ते कोंबडी, काळ्या बाहुल्या, सुया, लिंबू, हळदीकुंकू आणि काही लोकांचे फोटो घेऊन आले होते. अशाप्रकारे अघोरी पूजा केल्याने आईच्या अंगातील कॅन्सर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाईल याची त्यांना खात्री होती. त्यासाठीच त्यांनी ही पूजा करण्याचे ठरवले होते.