
धूमस्टाईलने सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक
पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्ह्यांची उकल केली आहे.
आकाश वजीर राठोड (वय 22, रा. मुलखेड, ता. मुळशी) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह चोरीचे दागिने घेऊन पुढे विकणारा मध्यस्थी सोमपाल नारायण सिंह (वय 31, रा. हरवर, हार्बर, डुंगारपूर, पाल, निठाउवा, राजस्थान) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी हिंजवडी फेज तीन येथे एका महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील 52 सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. यामध्ये एक जण संशयित आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असता सहायक निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित तरुण मेगापोलीस सर्कल फेज तीन येथे येणार आहे.
