
रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।रावेतमध्ये एका तरुणाचा डोक्यात पेवर ब्लॉक घालून खून करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका तरुणाचा मृतदेह रावेत गावठाण भागात सापडला असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. या तरुणाचे वय अंदाजे 35 ते 45 वर्षे आहे. त्याच्या डोक्यात पेवर ब्लॉक मारून खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.