
फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून
miपुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सायंकाळी मित्र आणि मैत्रिणी सोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. साहिल कसबे (वय 19) असे खून झालेल्या तरुणाची नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत साहिल हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही मित्र आणि मैत्रिणीसोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. टेकडीवरील कैलासवासी सदू शिंदे आणि मैत्रिणी सोबत बसला असताना तीन आरोपी त्या ठिकाणी आले. दुसऱ्यांच्या मैत्रिणी सोबत कशाला फिरत असतोस असे म्हणून आरोपींनी त्याच्यासोबत वाद घातला. आधी त्याला लाकडी बांबूने मारहाण केली. तर एका आरोपीने चाकूने त्याच्या मानेवर, पोटावर आणि डोक्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या साहिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोन आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
