
पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून विद्यार्थ्याला लुटले
पुणे लाईव्ह I २३ डिसेंबर २०२२ I पिंपरीत शस्त्राचा धाक दाखवून तिघांनी विद्यार्थ्याला लुटले.ही घटना गुरुवारी (दि.22) सकाळी पावणे सहा वाजता संत तुकाराम नगर येथे घडली.
हर्ष आनंद (वय 21, रा. पिंपरी. मूळ रा. बिहार) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14 /सीझेड 0069 या दुचाकीवरून आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर येथून पायी चालत जात होते. ते बॅडमिंटन कोर्ट हॉल येथे आले असता दुचाकीवरून तिघेजण आले. त्यांनी लोखंडी सुऱ्याचा फिर्यादीस धाक दाखवला. त्यांनतर फिर्यादीकडील एक मोबाईल फोन, चेन, अंगठी आणि रोख रक्कम असा एकूण 12 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
