PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

नर्‍हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नर्‍हे स्मशानभूमी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी दुपारी एका टँकरने तीन वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मागील काही दिवसांत महामार्गावर स्मशानभूमी, भूमकर ब्रीज , नवले ब्रीज या परिसरात हे अपघात झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परत याच ठिकाणी दोन ट्रक एकमेकांवर आदळल्याची घटना घडली.